Wednesday, August 4, 2010

A cup of coffee...

"अ कप ऑफ कॉफी" म्हणजे नक्की काय ???  खरच सुचत नाही मला काय काय लिहायच ते.. हो पण एक गोष्ट मात्र नक्की की मे इथे कुठल्याच प्रकारची कॉफीची recipe पोस्ट नाही करणार आहे.. :)

अ कप ऑफ कॉफी म्हटल की एका कप मध्ये चॉकलेटी रंगाचा थोडस कडवट पेय वरती क्रीम ने आयसिंग करून आपल्या समोर ठेवल आहे, फक्त एवढच आठवत का??  की मग त्याच सोबत मनात खेळ मांडतात ही वाक्य "ए चल ना कुठेतरी निवांत बसून गप्पा मारू" , "मला तुझशी थोडस बोलायच आहे, कॉफी शॉप मध्ये जाउयात??" , "ए आज lecture नको कंटाळा आलाय, चल ccd मध्ये जाउ..."
ही सगळी वाक्य कशी मनात मोरासारखी थुई थुई नाचू लागतात..

कॉफीच्या ह्या छोट्याशा कप बरोबर आपल्या आयुष्यातील कितीतरी सुंदर क्षण जोडलेले आहेत.. कॉफी म्हटल की आठवतात त्या ccd मधल्या तास-तास रंगलेल्या गप्पा, barista मध्ये एक मेकांची केलेली टिंगल, रिलॅक्स मधल्या खलबती, एक मेकांशी मारलेल्या मनसोक्त गप्पा, मित्रांना सांगितलेल मना-मधल गोड गुपीत, रात्र रात्र केलेला अभ्यास...


कस त्याला M3 चा पेपर अवघड गेला होता तेव्हा चेंज म्हणून ccd मध्ये गेलो आणि नुसत्या गप्पा हाणल्या, ऐन परीक्षेचा काळात.. चेंज वगैरे बाजूलाच पण क्रिटिकल पर्यंत M3 ने काही त्याची साथ सोडली नव्हती..
कॉलेज dinner फालतू होता, हे तर फक्त निंमिता होत रात्री ११ वाजता ccd मध्ये जाउन टाइमपास करण्याच..
कॉफी चा चवी पेक्षा आजही जिभेवर रेंगळते ती ह्या आठवणींची चव..

पण आजचा आपल्या ह्या आयुष्यात आपले हे सुंदर क्षण भूर उडून गेले आहेत.
आज वन बाय टू कॉफी शेअर करायला कोणी नाहीए. निवांत गप्पानसाठी कोणा जवळच वेळ नाहीये.. आपल आयुष्या बांधल गेलय त्या घड्याळाचा काट्या मध्ये. आपण ही पळत असतो त्या सेकण्ड काट्या सारखे आपल्या रोजचा जीवनात... ह्या टिक टिक टिक टिक पळणार्‍या काट्या ने आपल्या कडून बर्‍याच गोष्टी हेरावून घेतल्या आहेत.



आज देखील तेच ccd, तीच कॉफी पण तिला त्या गप्पांची सर नाही.. घशातून खाली उतरते फक्त एक कडवट चॉकलेटी द्रव्य...
पण मला ह्या टिक टिक आयुष्यातून बाहेर पडायचाय आणि माझा कॉफीचा कप परत मिळवायचाय.. खर तर तो कायम आपल्या जवळच असतो, फक्त आपण आपल्या routine मध्ये इतके busy झालोत की आपण नकळत मनाचा एका कप्प्यात हा कप ठेवून दिला आहे..

तेवढा फक्त बाहेर काढायचाय... हरवलेले क्षण परत मिळवायचे आहेत.. :)

4 comments:

  1. shruti... tu thik ahes na, aga kai zalay kai tula. aaj kaal he sagla mast jamtay tula. :D

    lagta hai sangat ka asar hai. :P :P

    ReplyDelete
  2. awesome shruti.... full form madhe aahes sadhya....
    खर तर तो कायम आपल्या जवळच असतो, फक्त आपण आपल्या routine मध्ये इतके busy झालोत की आपण नकळत मनाचा एका कप्प्यात हा कप ठेवून दिला आहे..

    तेवढा फक्त बाहेर काढायचाय... हरवलेले क्षण परत मिळवायचे आहेत.. :)

    Killer ekdum...................... :)

    ReplyDelete
  3. Kharach.....ekdum khara ahe...aj kal asach hot ahe..apan sagle evadhe routine madhe busy jhalo ahot ki ekmekana velach deu shakat nahi....ani jevaha asa vatat ki chala ata mitran barobar gappa marave tar te sagle aplya kamat/sansarat busy jhalele astat...ani urato phakta apan....
    kharach...kahihi aso apan tharvayala pahije ki kahihi aso tari apan ek divas tharvayacha ani nehami bhetayacha...

    ReplyDelete
  4. Shruti...too good...for me, nothing is so healing as the realization..

    ReplyDelete