Tuesday, July 5, 2011

आठवणी

   मनाचा कोपर्‍यात कुठेतरी अगदी खोल साठवून ठेवलेल्या अस्तत. कितीही आत लपावल्या तरी कधीतरी सापडतात, अगदी नको नको वाटत असताना हळूच डोका बाहेर काढतात. कधी कधी अगदी रडवतात  आणि कधी कधी एका क्षणात चेहरयवर हसू आणतात.. किती सुंदर असतात ह्या आठवणी..
सगळ सगळ अगदी अरशा सारखा स्वच्छ दिसत.. अगदी कालच घडल्या सारखा वाटत..

मग  ते काहीही असो अगदी कॉलेज मधे केलेला टाइम पास , घरी ताप मारुन पाहिलेला सिनेमा , पेपर चा आध्यल्या रात्री जागून केलेला अभ्यास, कॉलेज चा त्या ट्रिप्स , एक मेकांचे साजरे केलेले वाढ दिवस.. वय वाढत असताना कधी लक्षात आलाच नाही की एक दिवस असा पण येईल की वर्षा नु वर्षे एक मेकांशी भेट होणार नाही.. :(  शुल्लक करणांवरून झालेले ते वाद.. रूसवे फूगवे , आज आठवल तरी हसू येता.. रीझल्ट चा दिवस.. प्रत्येकाच्या चेहरया वरची उत्सुकता.. गंमत म्हणजे इंजिनियरिंग मधे किती मार्क पडले ह्या पेक्षा सगळे विषय सुटले की नाही ह्याची धड धड जास्त असते.. अगदी डू ऑर डाय सिचुयेशन असते..

ऑफीस मधल्या पार्ट्या, रात्र रात्र बसून केलेल काम, रात्री १० वाजता बस स्टॉप वरची पाणी पुरी.. मॅनेजर चा नावाने केलेला शांख.. अपरैसल चे इंटरव्यूस, चांगली ग्रेड दिली नाही म्हणून केलेला आरडा ओरडा.. आता बस्स झला, नवीन नोकरीच शोधायची. अशी चिडून केलेली विधाने.. अगदी काल घडल्यासारखा वाटतात.. प्रत्यक शुक्रवारी मॅक डोनाल्ड मधे जान्यावरून झालेले वाद, न गेल्यामुळे झालेली चीड चीड.. ;) किती छान असतात ह्या आठवणी.. दुपारचा कडक उन्हात एखाद्या झडाचा सावली ला उभा राहावा तसाच आयुष्याचा दुपारी ह्या आठवाणीच आपल्याला आडोसा देतात..

कधी कधी मनात विचार येतो खरच कसा काय जमत अससेल आपल्याला हा सगळा एवढा प्रवास लक्षात ठेवायला... गणितातले पाढे पाठ करताना अगदी नाकी नउ यायचे पण मागचा वर्षी चा पार्टीत त्याने किती ग्लास दारू प्यायली होती आणि तो काय काय बोलला होता हे आपण अगदी शब्द अन् शब्द बीनचुक सांगतो.. हीच बहुतेक आपल्या छोट्याशी मनाची गंमत असेल.. :) असो...

आकाशातुन एखादी सुंदर परी उतरून आपल्या समोर उभी राहावी तसच आयुष्याचा दुपारी ह्या आठवणी एका पाठोपाठ एक झरा झर आपल्या डोळ्या पुढून सरकतात.. आणि गंमत म्हणजे आपल्याच आठवणी, आपल्याच मनात, पण आपला त्यावर मुळीच ताबा नसतो.. उधाणलेल्या समुद्रा सारख्या कधी कधी त्याही उधाणतात.. आणि ह्याच आठवणी मग ओठांवर हसू आणि डोळ्यात अश्रू देऊन जातात.. खरच किती सुंदर असतात ह्या आठवणी.. अगदी अविस्मरणीय...