Wednesday, May 20, 2009

शिवाजी महाराज


"शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप"


संत रामदासंनी शिवाजी महाराजन्विशायी जे उदगार काढले त्यात जराही अतिशोयुक्ति नाही। कीर्तिवंत, गुणवंत, विद्यावंत असे महाराज शिवाजी ह्या भूतलावर एकमेवाद्वितीय ठरले । असा रजा पुन्हा होणे नाही । शुन्यातुन विश्वाची निर्मिती करावी त्याप्रमाणे स्वतः जवळ काही, शास्त्र नाही , धन नाही , राज्य नाही , असे असताना त्यांनी हिन्दवी स्वराज्याची स्थापना करणारे महाराज शिवाजी किती महत्वकांक्षी होते । त्यांचे धन म्हणजे जिजामाता , शास्त्र म्हणजे खाल्ल्या मिठाला जागणारा मावला मराठा आणि राज्य म्हणजे अक्खा महाराराष्ट्र पण मोग्लांचा ताब्यात असलेला ।

महाराष्ट्राच्या एका कोपर्यआतील किल्ल्याचा भगवा फडकू लागला आणि त्याने दिल्लीच्या शेहेंशाहा औरन्गाजेब्ची झोप उडाली । तोह सैन्यासह जतिनिशी महाराष्ट्रात ताल ठोकून राहिला पण शिवाजी राजांच्या गनिमी काव्या पुढे त्याने नांगी टाकली । शाहिस्तेखानाला आपली बोटा आणि अफाज़ल्खानाला आपला जीव मावा लागला । अदिलशहाने शिवाजी राजांना चूहा म्हणून हिनाव्ला होता, त्याला आता समजला होता की हां "चूहा" आता आपल्याला सुखाची झोप लागू देणार नाही।

हिन्दवी स्वराज्य स्थापनारे शिवाजी राजे कर्तृत्व आणि प्रराब्धावर विश्वास ठेवणारे होते, म्हणून तर " हे तो श्रींचे राज्य " अस म्हणून त्यांनी पर्मेश्वरालाच आपल्या विजयाचे साक्षीदार मानले, व आपली निष्ठां व्यक्त केली, भवानी मातेकडून वरदाहस्ता घेतला।

शिवाजिंचे चरित्र म्हणजे एक महानाट्य आहे, ज्यात पराक्रम आहे, चमत्कार आहे, जिद्न्यासा आहे । म्हणुन श्रेष्ठ साहित्यीक नरहर करुन्द्कर यांनी शिवाजी ला अवतारी पुरूष का म्हणू नये ह्याचा सविस्तार ऊहापोह केला आहे।

(P.S. - Please excuse a few words which are spelt incorrectly, thats because this is the hindi font, which does not included few of the marathi alphabets)