Monday, August 2, 2010

असतात काही नाती अशीच.......

आपण रोज कित्तेक लोकांना भेटतो, त्यांचाशी बोलतो. काही आपले मित्र असतात काही colleagues तर काही अगदीच अनोळखी नवीन चेहरे. सगळेच काही आपल्या मनावर त्यांचा ठसा उमटवत नाहीत. तरीही ह्या सगळ्यांशी एक नात जोडल जात..


काही लोकांना वारंवार भेटून तर काही लोकांची एखादी गोष्टा आवडते म्हणून ते मित्र असतात किवा स्नेही किवा आजचा भाषेत म्हणायचा झाल तर "aquaintances"..

पण काही नाती अशी असतात जी अचानक आयुष्यात येतात आणि आयुष्य बनतात..
असच काहीतरी झाल आहे....


कधी कधी एखादी व्यक्ती किती पटकन आपल्या आयुष्यात येते, म्हणजे काही कळायचा आत ती व्यक्ती आपल्याला आपली वाटू लागते... कधी मनाचे बंध जूळतात हे कळतच नाही... ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक अविभज्या घटक होऊन जाते..

पण ही व्यक्ती आपली मैत्रीण नसते, मित्र नसतो, प्रियकर, प्रेयसी काही काहीच नसते, पण तरी ती आपलीच असते आणि खूप खूप जवळची वाटते... ते एक वेगळाच नात असत.. ह्या अशा नात्याना नावच नसत.. त्या व्यक्ती चा नुसता फोन किवा एसएमएस आला तरी मन हुरळून जात..

आपण त्यांना रोज भेटत नाही किवा रोज फोन वर गप्पा देखील मारत नाही, पण तरीही "आज भेटायच का" अस म्हटल्यावर आपण कितीही busy असलो तरी एका क्षणाचाही विलमभ न करता आपण पटकन "हो" म्हणतो.. तेव्हा आपण आपल schedule कधीच check करत नाही.. आणि गंमत म्हणजे भेटिचा reminder लावायची देखील गरज पडत नाही...:) इथे इगो वगैरे काही नसत.. अगदी spiritual भाषेत बोलायचा झाल तर "self-less"....


भेटायच पण नुसती भेट म्हणून त्यात कसलच गणित नसत, नफा किवा तोटा नसतो देवाण घेवाण नसते.. काहीच मागायचा नसत आणि काहीच द्यायच नसत.. मिळवायचा असतो तो केवळ एकमेकांचा सहवास.. - काही क्षणांचा का होईना....

आजचा जगात अशा भेटी म्हणजे अगदीच दुर्मीळ...पण भेटल्यावर भर भरून गप्पा मारायचा असतात, एकमेकन निरखून पाहायचा असत.. आणि वेळ संपत आली की परत शून्य... दोन तास गप्पा मारल्यावर सुद्धा अस वाटत, अरे खूप बोलायच राहून गेल.. अजुन मला बराच काही सांगायच होत..

ह्या अशा काही व्यक्ती मनात घर करून बसतात ते तिथून कधीच ना जाण्यासाठी... ते आपले असतात आणि नसतात पण..

ह्याला मित्र म्हणाव प्रियकर म्हणाव philosopher की guide म्हणाव, हा एक खूप मोठा प्रश्न मनात तांडव मांडत असतो..


कधी वाटत काय म्हणत असतील अशा नात्यांना.. कधी वाटत नकोच काही म्हणयला.. ही नाती आपल्या पुर्तीच असतात नकोच जागा पुढे मांडायला.. तसही लोकांना अशी नाती मुळी कळतच नाहीत... असु द्याव हे फक्ता दोघांपुरती.. दोघाननीच ठरवाव.. तसच चालू द्यावा सगळा प्रवास...

राहू द्यावीत ही नाती निनावी - पण ज्याची फक्त त्या दोघाननाच ओळख आहे, दोघांपुरतीच सीमीत .

असतात काही नाती अशीच - न समजणारी न उमगणारी आपल्या पुर्तीच आणि आपलीच....

9 comments:

  1. shrutiiii... aga rani kuthe lapavun thevla hotas ha guun??? aga kai lihilayes Qaaatil... would like to read the same post time and time again. karach. :):)

    असतात काही नाती अशीच - न समजणारी न उमगणारी आपल्या पुर्तीच आणि आपलीच... wah!!!!

    ReplyDelete
  2. Wow..tamya...truly amazing.....kharach khup avadla manapasun...Asa konitari kharach pratekachya ayushat asayala pahije ki tyaccha naav ghetlyavar aplaya cheheryavar hasu yeta....
    Ti ji feeling ahe that is truly amazing....Hi tujhi post saglyat chan ahe..karan je tujhya rudayaat ahe ,ani tula kay vatat ahe tech tu lihila ahe..mhanje tujhi post vachun asa vatat ki ti vyakti aplya samor ahe ani apan tila baghun tiche kautuk karat ahe...
    Khara bolava tar ashya vyakti baddal jevadha bolava tevadha kamich ahe...pan je kay tu lihila ahe..te kharach ek no. ahe.....

    ReplyDelete
  3. Ek number ahe post, awadla aplyala, MANDAL abhari ahee.
    tumhala ata kalele ka jehwa tumchya javalach mitr ki jodidara ha kauni dusra nasu apla ahe ani aple natyanche dhage jodle gele.. This can only happen when u feel internally blessed.

    very good keep it up and sned it to your husband and get his reaction..
    He would also love this.
    take care.

    ReplyDelete
  4. Very well written, and every one has this 'someone' in their life. I can relate it with that 'someone' in my life and I am forwarding your post to her :) ........ keep writing, i like to relate with people who have good blogging skills.

    ReplyDelete
  5. ekach no!! jhakas lihilay. Sakal la de ha article tuzya navane...lagech publish karatil...:) aflatoon aahe. Avadla aplyala....

    ReplyDelete
  6. awesome madam............. ek number.....

    ReplyDelete
  7. me ithey parat chakkar taakli... ha post wachnya sathi.. parat mala titkach awadla... :)

    ReplyDelete